मुंबई: मुंबांत सार्वजनिक शौचालयांची स्थिती दयनीय आहे. २०२३ सालच्या आकडेवारीनुसार महानगरातील एकूण सार्वजनिक शौचालयापैकी ६८०० म्हणाजे ६९ टक्के सार्वजनिक शौचालयांमध्ये पाणी व ६० टक्के शौचालयांत वीज जोडणीच झालेली नसल्याचे प्रजा फाऊंडेशनच्या अहवालातून समोर आले आहे. यात स्त्रियांसाठी शौचालयांची संख्या अपुरी आहे. पर ४ सार्वजनिक शौचालयांतील केवाळ १ शौचालय स्त्रियांसाठी उपलब्ध आहे. एकूणच लोकसंख्येच्या तुलनेत शौचालयांची संख्या कमी व असुविधांयुक्त असल्याचे निरीक्षण प्रजा फाऊंडेशनने मांडले आहे.