देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची लोकसंख्या 1.92 कोटी असून नोकरी धंद्यासाठी दररोज मुंबईत येणाऱ्यांची संख्या 80 लाखांवर आहे. (मुंबई शहराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 60 हजार कोटींवर तर 82 हजार कोटींपेक्षा जास्तीच्या बँकेतील मुदत ठेवी आहेत.) मात्र तरीही मुंबईत नागरिकांसाठी शौचालयांची भयंकर कमतरता भासत आहे.