TV 9 Marathi
मुंबईत स्रियांची कुचंबणा सुरुच, दर 4 पब्लिक टॉयलेटपैकी केवळ 1 महिलांसाठी, प्रजा फाऊंडेशनच्या अहवालात धक्कादायक माहीती
साल 2023 च्या आकडेवारीनुसार मुंबईत दर एक हजार पुरुषांमागे स्रियांचे प्रमाण 853 इतकं आहे. परंतू मुंबईतील सार्वजनिक शौचालयांच्या बाबतीत मुंबईत दर चार पुरुष सार्वजनिक शौचालयांमागे महिलांकरीता केवळ एक शौचालय असे व्यस्त प्रमाण आहे. अशा परिस्थितीत शहराचे नियोजन करणाऱ्यांनी महिला देखील एक माणूसच आहेत याचा विचार करुनच या गोष्टीकडे लक्ष पुरवावे अशी मागणी प्रजा फाऊंडेशनने केली आहे.