Loksathha
मुंबईतील वायू प्रदूषण तक्रारींमध्ये वाढ

मुंबईत नागरिकांच्या वायूप्रदूषणाबाबत तक्रारी वाढल्या असल्याचे प्रजा या स्वयंसेवी संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून समोर आले आहे. मुंबई आणि परिसरातून २०१९ ते २०२३ या कालावधीत वायूप्रदूषणाच्या तक्रारी ३०५ टक्क्यांनी वाढल्या आहेत.