दक्षिण मुंबईतील सी वॉर्ड (मरीन लाईन्स, चिरा बाजार, गिरगाव) मध्ये पुरुषांच्या ६ सार्वजनिक शौचालयांमागे स्त्रियांसाठी केवळ १ शौचालय उपलब्ध आहे. ही लिंगनिहाय तफावत अग्रक्रमाने दूर करणे गरजेचे असून स्त्रियांसाठीदेखील पुरेशी शौचालय संख्या असायला हवी अशी मागणी प्रजा फाउंडेशनतर्फे करण्यात आली.