मुंबई : घनकचरा व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण, मलनिःस्सारण इत्यादींसाठी मुंबई महापालिकेकडून वर्षाला हजारो कोटींची तरतूद केली जाते. ही तरतूद करूनही नागरी समस्या 'जैसे थे'च राहत असून त्या पूर्णपणे सुटू शकलेल्या नाहीत. या समस्यांविषयी मुंबईकरांनी महापालिकेकडे तक्रारींचा पाऊसच पाडला आहे.