लोकमत
पोलिसांचे सर्वाधिक मृत्यू हृदयविकाराने मुंबई पोलिस दलात ३० टक्के मनुष्यबळ कमी, हृदयविकाराचे १५० बळी.

मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिस दलामध्ये मंजूर पदांपेक्षा ३० टक्के संख्याबळ कमी असल्याचे प्रजा फाउंडेशनच्या अहवालातून समोर आले आहे. मुंबई पोलीस दलात सध्या ५२ हजार संख्याबळ आहे, त्या तुलनेत जुलैपर्यंत मुंबई पोलीस दलात केवळ ३६ हजार ४२५ पोलीस कार्यरत आहेत.