महानगर
मुंबईकरांच्या समस्यांना वाचा फोडण्यात शिवसेना अव्वल

मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि मुंबईकरांसाठी नेहमीच रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या शिवसेनेने विधिमंडळातही मुंबईकरांच्या समस्या हिरीरीने मांडल्या आहेत. दिंडोशी विधानसभेचे आमदार आणि शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी विधिमंडळात सर्वाधीक उपस्थित राहून मुंबईकरांचे प्रश्न, समस्यांना वाचा फोडली.