लोकमत
मुंबईकरांचे हात नाकावर, तर महापालिकेचे कानावर

कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लागत नाही, आमच्या विभागात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे, अशा अनेक तक्रारी विविध ठिकाणांहून येत असताना घनकचरा व्यवस्थापन विभागातील रिक्त पदांमुळे मुंबईचा कचरा पेटण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे.