वृत्तमानस
सोसायट्यांनी ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करणे बंद केल्यामुळे रोज क्षेपणभूमीवर जाणाऱ्या कचऱ्यात वाढ - प्रजा फाऊंडेशन

मुंबई महानगरपालिकेत आयुक्त म्हणून अजोय मेहता असताना त्यांनी मोठ्या सोसायट्यांना की, ज्या सोसायट्यामध्ये रोज १०० किलो कचरा जमा व्हायचा त्यांना ओला व सुका कचरा वेगवेगळा करून ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याची सक्ती केली होती. ही खतनिर्मिती करण्यासाठी त्यांना पालिकेने सोसायटीजवळ जागाही दिली होती. तेव्हा क्षेपण भूमीवर जाणाऱ्या रोज ७२०० मेट्रिक टन कचऱ्यात २ हजार मेट्रिक टन कचऱ्याची घट झाली होती. पण ११ मे २०१९ रोजी मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी बदली झाल्यानंतर ओ कचऱ्यापासून खतनिर्मिती करणे थांबले असल्याचे प्रजा फाऊंडेशन च्या एका अहवालामुळे पुढे आले आहे. आता क्षेपणभूमीवर रोज ७५८२ मेट्रिक टन कचरा जात असल्याचे प्रजा क्या या अहवालात म्हटले आहे.