मुंबईत दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या प्रमाणात घट झाली असली तरी नागरिकांच्या घनकचऱ्याबाबतच्या तक्रारी वाढल्या असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे ओल्या कचऱ्याची डोकेदुखी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यातही एकूण कचऱ्यापैकी सुमारे ७३ टक्के भाग हा ओला कचरा असतो असे आढळून आले आहे, ज्यामध्ये टाकाऊ अन्न पदार्थांचा सर्वाधिक समावेश आहे, तर उर्वरित कचऱ्यामध्ये लाकूड, कापड, वाळू, दगड, माती, कागद, प्लास्टिक यांचा समावेश आहे. पालिकेच्या २०२०-२१ च्या पर्यावरण स्थितीदर्शक अहवालातून ही बाब पुढे आली असून, ती प्रजा फाउंडेशनने आपल्या सादर केलेल्या अहवालात मांडली आहे.