आपला महानगर
कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात मुंबई महानगरपालिकेला अपयश

मुंबईत सन २०२० च्या तुलनेत २०२२ मध्ये कचऱ्याच्या प्रमाणात १० टक्के वाढ झाली आहे. मागील दहा वर्षात नागरिकांच्या वायू प्रदूषणाच्या तक्रारीत २३७ टक्क्यांनी तर कचरा विल्हेवाटीचा तक्रारींमध्ये १२४ टक्क्यांनी वाढ झाली आहे/ मुंबईतील बदलते हवामान, स्वचतेचा आभाव, पालिका प्रशासनाची अकार्यक्षमता, वायू प्रदूषण, उष्णतेच्या लाटा, आणि पाण्याचे प्रदूषित स्रोत, अशा गंभीर समस्या मुंबईला भेडसावत आहेत.