पुण्यनगरी
कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात मुंबई महानगरपालिकेला अपयश

बदलत्या वातावरणामुळे तसेच अकार्यक्षम स्वछता, कचरा व्यवस्थाप प्रक्रियेमुळे मुंबई शहराला वायू प्रदूषण, उष्णतेच्या लाटा आणि प्रदूषित पाण्याचे स्रोत अशा गंभीर समस्या भेडसावत आहेत. मागील दहा वर्षात नागरिकांच्या वायू प्रदूषणाच्या तक्रारीत २३७ टक्क्यांनी, तर कचरा विल्हेवाटीचा तक्रारींमध्ये १२४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.