तरुण भारत
मुंबईतील वायुप्रदुषणाच्या तक्रारींत २३७ टक्क्यांनी वाढ

मुंबईमध्ये घन कचरा व्यवस्थापनेसंबंधी नागरिकांच्या तक्रारी १२४ टक्क्यांनी वाढल्या आहेत. वायूप्रदुषणासंबंधी नागरिकांच्या तक्रारी २३७ टक्क्यांनी आणि मल:निसारणसंबंधी नागरिकांच्या तक्रारी ३५ टक्क्यांनी वाढल्या असून २०२२ मध्ये या तक्रारी सोडवण्याचा सरासरी अधिकतम कालावधी ३१ दिवस असल्याचे 'प्रजा फाउंडेशन' च्या अहवालातून समोर आले आहेत.