Saam NEWS
मुंबई असुरक्षित बनतेय? २०१२ ते २०२१ दरम्यान बलात्काराच्या घटनांमध्ये २३५% वाढ, प्रजा फाऊंडेशनच्या अहवालातून अनेक प्रश्न उपस्थित
मुंबई शहर (Mumbai News) राहण्यासाठी सुरक्षित शहरांपैकी एक मानलं जात. मात्र प्रजा फाऊंडेशनच्या एका अहवालानंतर या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मुबंई शहरातील गुन्हेगारीची आकडेवारी धडकी भरवणारी आहे. महिलांची सुरक्षिततेचा मुद्दाही या आकडेवारीतून समोर आला आहे. तसेच मुंबई पोलिसांची (Mumbai Police) ताकद एवढ्या मोठ्या लोकसंख्येला सुरक्षित ठेवण्यासाठी अपुरी पडत असल्याचंही या आकडेवारीतून अधोरेखित होत आहे.