ABP Marathi
10 वर्षात मुंबईतील गंभीर गुन्ह्यात 112 टक्क्यांनी वाढ! गुन्ह्यांची संख्या वाढत असताना पोलिसांची 28 टक्के पदे रिक्तच
मुंबई शहरांमध्ये मुख्य गुन्ह्यात गेल्या दहा वर्षात कमालीची वाढ झाल्याचे वास्तव 'मुंबईतील पोलीस यंत्रणा आणि कायदा व सुव्य सद्यस्थिती 2022' या प्रजा फाउंडेशनच्या आजच्या प्रकाशित झालेल्या अहवालात समोर आला आहे. 2012 ते 2021 च्या कालावधीत गंभीर गुन्ह्यांमध्ये 112 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुलभ झाली हे दिलासादायक असले तरी महिला व मुलांवरील गुणांची वाढती संख्या चिंताजनक आहे