My Mahanagar
प्रजाच्या टॉप पाचमध्ये भाजपच्या तीन, शिवसेना, काँग्रेसच्या एका आमदाराची बाजी
प्रजा फाऊंडेशनतर्फे मंगळवारी ‘मुंबईतील आमदारांचे प्रगती पुस्तक’ अहवाल जाहीर करण्यात आला. या अहवालात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या टॉप पाचमध्ये भाजपच्या तीन, शिवसेना, काँग्रेसच्या एका आमदारांची बाजी मारली आहे. या पाच आमदारांमध्ये, काँग्रेसचे आ.अमीन पटेल प्रथमस्थानी, भाजपचे आ. पराग आळवणी दुसऱ्यास्थानी, शिवसेना आ.सुनील प्रभू तिसऱ्यास्थानी आहेत. या टॉप पाचमध्ये, भाजपचे आ.अमित साटम व आ.अतुल भातखळकर यांचाही समावेश आहे.