आपलं महानगर
पाणी, कचरा, शौचालयांच्या तक्रारींचा पालिकेवर पाऊस

मुंबईत वाढत्या लोकसंख्येबरोबरच नागरी समस्यांबाबतही तक्रारींचा पाढा मुंबईकर वाचत आहेत. मुंबई महापालिकेकडून मुंबईला रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य, उद्याने, कचरा व्यवस्थापन, ड्रेनेज आदी विविध सुविधा देण्यात येतात. गेल्या २०१२ ते २०२१ या दहा वर्षांच्या कालावधीत नागरी समस्यांबाबत पालिकेकडे एकूण ९४६२५३ तक्रारी आल्या आहेत, असा निष्कर्ष प्रजा फौंडेशनने काढला आहे