Loksatta
२५ नवी ‘आरोग्य केंद्रे’ महिनाभरात सुरू ; सकाळी नऊ ते संध्याकाळी चार वेळेत कार्यरत
नागरिकांना घराशेजारीच प्रतिबंधात्मक आणि प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी पालिकेने आगामी अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेली ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्रे’ सुरू करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. या महिन्यात शहरात अशी २५ केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. परंतु ही केंद्रे पालिकेच्या अन्य दवाखान्यांप्रमाणेच सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत सुरू राहणार आहेत.