नवशक्ती
सरकारी दवाखान्यांची कमतरता मुंबई फर्स्ट आणि प्रजा फॉउंडेशनचे सर्वेक्षण

मुंबईकरांची लोकसंख्या दीड कोटींच्या घरात पोहचली असून त्या तुलनेत आरोग्य यंत्रणेवर ताण येतो. त्यामुळे मुंबईत ८५८ सरकारी दवाखान्यांची गरज आहे. सध्या १९९ दवाखानेच उपलब्ध आहेत.यातील १८७ दवाखान्यांपैकी फक्त १५ दवाखानेच १४ तास सुरु असून उर्वरित ५ ते ८ तासच सुरु असतात.