लोकसत्ता
आरोग्य यंत्रणा कमकुवतच लोकसंख्येच्या प्रमाणात प्राथमिक दवाखान्यांची संख्या जेमतेम २० टक्के

करोनाकाळात मुंबई महापालिकेने उभारलेल्या तात्पुरत्या आरोग्य व्यवस्था आजही कमकुवत असल्याचे निरीक्षण "मुंबई फर्स्ट" आणि प्रजा फाऊंडेशनच्या अहवालात नोंदवण्यात आले आहे.मुंबईतील लोकसंख्येच्या तुलनेत ८५८ प्राथमिक दवाखान्यांची गरज असताना प्रत्यक्षात त्याच्या केवळ २० टक्केच, १९९ दवाखाने सध्या कार्यरत असल्याचे या अहवालातून उघड होत आहे.