लोकसत्ता
वचननामे कागदावरच ! पाच वर्षांपूर्वी दिलेली आश्वासने, घोषणा हवेतच; पाणीपुरवठा, गुळगुळीत रस्ते, फेरीवाला धोरणाचे प्रश्न कायम

मुंबई महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सर्वच राजकीय पक्षांनी दिलेल्या वचनांना लावलेल्या वाटाण्याच्या अक्षतांवर प्रजा फाऊंडेशनने आपल्या अहवालाच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकला आहे.