लोकमत
मुंबईतील ९७ टक्के विद्यार्थ्यांनी घेतले ऑनलाईन शिक्षण

लॉकडाउनच्या काळात मुंबईतील ९७ टक्के विद्यार्थी, पालकांनी शिक्षणासाठी ऑनलाईन माध्यमांचा, पर्यायांचा वापर केला,मात्र भविष्यातील शिक्षणासाठी ऑफलाईन शिक्षणपद्धतीच योग्य ठरेल, असे मत ६२ टक्के मुंबईकर पालक, विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.