TV 9 Marathi
मुंबईच्या महापौर झाल्या कोविड योद्धा, किशोरी पेडणेकर पुन्हा नर्सच्या भूमिकेत

‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी परिचारिकांशी संवाद साधला. किशोरी पेडणेकर यांनी नायर रुग्णालयात परिचारिकेच्या वेषात जाऊन तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा हुरुप वाढवला.