प्रचंद्र खपाचे एकमेव निःपक्ष व निर्भीड दैनिक पुढारी
मुंबई Mumbai News | शौचालयांची कमतरता, महिलांची कुचंबणाच!
मुंबई : मुंबई शहरात सार्वजनिक शौचालयांची स्थिती दयनीय असून यात महिलांसाठी अपुरी व्यवस्था असल्याने त्यांची कुचंबना सुरूच असल्याचे वास्तव प्रजा फाऊंडेशनने मंगळवारी जारी केलेल्या अहवालात मांडले आहे. यात त्यांनी 2023 सालच्या आकडेवारीनुसार महानगरांतील एकूण सार्वजनिक शौचालयांपैकी 6800 म्हणजे 69 टक्के सार्वजनिक शौचालयांमध्ये पाणी व 60 टक्के शौचालयांत वीज जोडणीच झालेली नसल्याचेही म्हटले आहे.