Apla Mahanagar
मुंबईत शौचालयांची कमतरता, महिलांची कुचंबणा

देशाची आर्थिक राजधानीचे शहर असलेल्या मुंबईची लोकसंख्या १.९२ कोटी असून नोकरी धंद्यासाठी दररोज मुंबईत येणाऱ्यांची संख्या ८० लाखांवर आहे. मुंबई शहराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ६० हजार कोटींवर तर ८२ हजार कोटींपेक्षा जास्त बँकेत मुदत ठेवी आहेत, मात्र तरीही मुंबईत नागरिकांसाठी शौचालयांची मोठी कमतरता भासत आहे.